homeopathy 
नांदेड

Video : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गुणकारी

राजन मंगरुळकर

नांदेड : नेहमीसाठी आपली तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने होमिओपॅथी औषध घेणे ही चांगली बाब आहे. कोरोनापासूनचा धोका टाळण्यासाठी 'आर्सेनिक-३०' ह्या गोळ्या घेण्याची मानसिकता अनेकांची झाली आहे. वास्तविक पाहता ह्या गोळ्या आपली रोग प्रतिकारशक्ती वाढावी ह्यासाठी घेतल्यास त्या निश्चित फायदेशीरच ठरतील असे मत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमोल रवंदे यांनी सांगितले.

कोरोना बाधितांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे, तशीच त्याची भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत आहे. ही भीती दूर व्हावी, यासाठी प्रेमनगर येथील आर.के. बिल्डरचे अभिजीत रेणापूरकर यांनी शहरातील वजिराबाद भागात क्लिनिक असलेले होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमोल रवंदे यांना नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (ता.तीन) सायंकाळी बोलावले होते. या वेळी डॉ.अमोल रवंदे यांनी प्रेमनगर येथील नागरिकांशी बुधवारी सायंकाळी संवाद साधला. नागरिकांच्या शंकांचे निरसन त्यांनी या वेळी केले.

डॉ. रवंदे इंडिया हेल्थकेयर अवॉर्डने सन्मानित

डॉ. अमोल रवंदे हे अल्टरनेट नोबल पुरस्कार मिळालेले डॉ.जॉर्ज विटलकस, ग्रीस यांचे विद्यार्थी आहेत. मागील १३ वर्षांपासून वजिराबाद येथे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत. मागच्या वर्षी त्यांच्या सेवेसाठी त्यांना इंडिया हेल्थकेयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 

केरळमध्ये गोळ्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात
आयुष मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'आर्सेनिक-३०' ह्या गोळ्या घेण्याचे सुचविले. या उपाययोजनेचा फायदा केरळ राज्यात झाल्याचे तेखील आकडेवारीवरुन दिसून येते. केरळमध्ये सुरवातीला वाढलेली संख्या हळूहळू कमी झाली कारण तेथे २० ते ३० लाख 'आर्सेनिक-३०' ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या गोळ्या वाटप करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या गोळ्या घेतल्याने त्याचा फायदा दिसून आला आहे. 

ज्येष्ठ नागरिक, मुलांना होमिओपॅथीचा फायदा 
सर्वसाधारणपणे आपल्याकडे कोणतेही औषध घेताना ते एखाद्या रोगावर किती फायदेशिर आहे, याचा विचार करुन मगच घेतले जाते. मात्र, ज्येष्ठ नागरिक, मुलांना होमिओपॅथीचा फायदा हा त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी ह्यासाठी दिल्यास ते अधिक गुणकारी ठरु शकते. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना होमिओपॅथीक औषधी त्यांचे स्वभाव, दिनचर्या आणि खानपाण या सर्व बाबींचा विचार करु दिले जाते. विशेषतः होमिओपॅथीक औषधी ह्या गोड असतात. त्यामुळे त्या अनेकांना आवडतात. 

अशा घ्या गोळ्या  
'आर्सेनिक-३०' या गोळ्या सकाळी उपाशीपोटी सलग तीन दिवस मोठ्यांनी तीन ते पाच या प्रमाणात घ्याव्यात. त्या गोळ्या ॲलोपॅथीप्रमाणे थेट न घेता जीभेवर ठेवाव्यात आणि चगळाव्यात. गोळ्यांना हात लावू नये. तसेच पथ्य म्हणून कॉफीचे सेवन टाळावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

MSEDCL Bribe Case: रीलिज ऑर्डरसाठी लाचेची मागणी भोवली; महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

'मी दादा कोंडकेसोबत 3 सिनेमे केले परंतु नंतर...'' अशोक सराफ आठवण सांगताना म्हणाले..'ते डबल मिनिंगकडे...'

SCROLL FOR NEXT